राफेल विमानांबद्दलचं राजकारण आणि एच.ए.एल. ला डावललं जाण्यामागची सत्यासत्यता

राफेल

दाससौल्ट ने भारतात बनणाऱ्या विमानांच्या गुणवत्ते बद्दल जबाबदारी घेण्याचं नाकारलं तसेच त्यांनी १०८ विमानांच्या निर्मितीसाठी ३ कोटी मानवी तास देण्याचं कबूल केलं पण एच.ए.एल. ने ह्याच्या तीन पट मानवी तास मागितले ज्यामुळे विमानांची किंमत तीच ठेवणं दाससौल्टला मान्य नव्हतं. या बाबत मेक इन इंडिया च्या मार्फत येणाऱ्या नवीन कम्पन्या तीन कोटी मानवी तासांची अट कितपत मान्य करणार याबद्दल साशंकता आहेच.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय वायुसेनेत दाखल होणाऱ्या राफेल विमानांच्या खरेदी वरून खूप गदारोळ घडवला जात आहे. खरे तर ज्यांना ह्यातलं काही माहिती नाही ते पण घोटाळा झाला आणि घोटाळा झाला नाही अश्या उलट सुलट फैरी झाडत आहेत. राफेल विमानाची भारताला गरज का आहे? राफेल विमानात नक्की काय आहे? राफेल विमान आल्यावर काय चित्र बदलणार आहे? ह्या प्रश्नांची उत्तरं ह्यातल्या एकाला ही देता येणार नाहीत पण तो राजकीय मुद्दा बनवून उगाच आपली शक्ती वाया घालवत आहेत. सामान्य माणूस म्हणून राफेल विमान आणि त्याचे भारताला फायदे जाणून घेतल्यावर नक्की घोटाळा झाला का? झाला असेल तर कुठे? ह्यावर मत मांडणं योग्य राहील.

भारतीय वायुसेनेला भारताच्या रक्षणासाठी लढाऊ विमानांची गरज आहे. त्यांची गरज ओळखून भारताला कोणतं लढाऊ विमान सगळ्यात योग्य राहील ह्याची एक चाचपापणी २०११ च्या सुमारास केली. त्यानुसार अनेक बाजूने प्रत्येक विमानांचं विश्लेषण केल्यावर भारतीय वायुसेनेने दोन विमानांवर पसंतीची मोहर उमटवली. ज्यात एक होतं दाससौल्ट राफेल आणि दुसरं युरोफायटर टायफून. जवळपास १४४ लढाऊ विमानांची ही ऑर्डर होती. दाससौल्ट राफेल ने सगळ्यात कमी बोली लावल्याने त्यांना हे काम देण्यात आलं. पण अनेक मुद्यावर सहमती न झाल्याने हा सौदा २०१४ ला रद्द करण्यात आला. ज्यात ३६ विमान ही उड्डाणाच्या स्थितीत तर १०८ भारतात एच.ए.एल. च्या माध्यमातून बनवण्याच ठरलं होतं. पण दाससौल्ट ने भारतात बनणाऱ्या विमानांच्या गुणवत्ते बद्दल जबाबदारी घेण्याचं नाकारलं तसेच त्यांनी १०८ विमानांच्या निर्मितीसाठी ३ कोटी मानवी तास देण्याचं कबूल केलं पण एच.ए.एल. ने ह्याच्या तीन पट मानवी तास मागितले ज्यामुळे विमानांची किंमत तीच ठेवणं दाससौल्टला मान्य नव्हतं. या बाबत मेक इन इंडिया च्या मार्फत येणाऱ्या नवीन कम्पन्या तीन कोटी मानवी तासांची अट कितपत मान्य करणार याबद्दल साशंकता आहेच.

२०१४ साली फसलेला सौदा आणि जुनी होत चाललेली लढाऊ विमानं ह्यामुळे भारताचं हवाई दल कमजोर होत होतं. जो सौदा २०११ ला व्हायला हवा होता तो २०१६ पर्यंत न झाल्याने येणाऱ्या काही वर्षात भारतीय वायू दलाला पाकिस्तान आणि चीन ह्या दोन्ही शत्रूंवर हवेतून वचक ठेवणं कठीण जाणार होतं. अश्या वेळेस वेळ न दवडता भारताने ३६ दाससौल्ट राफेल उड्डाणाच्या स्थितीत घेण्याचा सौदा प्रत्यक्ष फ्रांस सरकारशी केला. हा सौदा दोन कंपन्यांमध्ये झालेला नाही तर दोन देशांच्या सरकारांमध्ये झालेला आहे. त्यानुसार ७.८७ बिलियन युरो च्या बदल्यात ही विमाने भारताला मिळणार आहेत. ह्या करारा नुसार आधीच्या किमतीपेक्षा ही विमाने भारताला स्वस्तात मिळाली आहेत. हा फायदा जवळपास (१२,००० कोटी रुपयांच्या घरात आहे.) ह्या शिवाय मेक इन इंडिया च्या मार्फत जवळपास ५०% भाग हे भारतीय कंपन्यांच्या सहर्कार्यातून बनवण्यात येणार आहेत. ज्याचा मोठा हिस्सा अनिल अंबानी ह्यांच्या रिलायंस डिफेन्स कडे आला आहे (ह्यामुळे काही लोक ओरडत आहेत) पण असं जरी असलं तरी त्यातून पुढील ७-८ वर्ष भारतात रोजगार निर्मिती होणार आहे. ह्या शिवाय आधीच्या करारात विमानचं तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याची अट भारताने घातली होती ती त्या वेळेला मान्य झाली नव्हती पण आता फ्रांस सरकारने हे तंत्रज्ञान भारताला देण्याचं सशर्त मान्य केलं आहे. ह्यामुळे भारतीय कंपन्यांना हे तंत्रज्ञान अवगत होणार आहे.

इतके पैसे देऊन भारतात येणारं राफेल लढाऊ विमान हे दोन इंजिन असलेलं मल्टी रोल कॉमब्याट लढाऊ विमान आहे. राफेल ओमनीरोल करण्यास सक्षम आहे. ओमनीरोल ह्याचा अर्थ होतो अनेक गोष्टी एकाच वेळेस. तसेच हे विमान आपल्या आत मध्ये ऑक्सिजन बनवू शकते. ह्यामुळे विमानतळावर पुन्हा फ्युल ज्यात ऑक्सिजन ही समाविष्ट असतो ते भरण्याचा किंवा ऑक्सिजन चा पुरवठा करण्याची गरज भासत नाही. भारताचं सध्याचं आघाडीचं लढाऊ विमान सुखोई ३० एम.के. आय.शी ह्याची तुलना केल्यास राफेल ची रेंज सुखोई पेक्षा जास्त आहे. २४ तासात राफेल ५ वेळा उड्डाण भरू शकते तर सुखोई ३ वेळा. राफेल च्या एकूण ताफ्यापेकी ७५% ताफा कोणत्याही क्षणी युद्धात जाण्यास सक्षम असतो तर हेच प्रमाण सुखोई च्या बाबतीत ५५% इतकं कमी आहे. राफेल हे ७०% कम्पोझिट मटेरीअल नी बनवलेलं आहे. पूर्णतः स्टेल्थ नसलं तरी शत्रूच्या रडार वर राफेल दिसणं हे तितकंच कठीण आहे. ह्याशिवाय राफेल स्काल्प आणि मेटोर क्षेपणास्त्र नी सुसज्ज आहे. ह्यातलं मेटोर हे क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत मारा करणारं जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र समजलं जाते. १०० किमी च्या क्षेत्रातील कोणत्याही विमानाला हवेतल्या हवेत लक्ष्यभेद करण्याची ह्याची क्षमता आहे.

भारताने खरेदी केलेल्या ३६ पेकी २८ विमान ही सिंगल सिट तर ८ ही डबल सिट असणार आहेत. दाससौल्ट राफेल च्या येण्यानं भारताची हवाई ताकद खूप वाढणार आहे पण अजून लढाऊ विमानांची गरज भारताला आहे. लढाऊ विमानांची किंमत ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. जसे कोणतीही गाडी घेताना त्यात अनेक व्हेरीएंट उपलब्ध असतात त्यामुळे किमतीत अनेकदा ३०%-४०% फरक पडतो. गाडी घेतल्यावर पण जसे सिट कव्हर, स्टीअरिंग कव्हर आणि इतर गोष्टींसाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागतात तसेच ह्या विमानांन सोबत येणाऱ्या अनेक विविध क्षेपणास्त्र, रडार आणि इतर तत्सम गोष्टींसाठी. ह्यात प्रत्येक ग्राहकाला डीलर कडून वेगवेगळी डील मिळते. म्हणजे ग्राहक जसा निगोसिएशन करेल तशी किंमत असते. तसेच इकडेही होते. त्यामुळे आपण किमतीचा अंदाज बंधू शकतो. अनेकदा आपण विमानांसोबत कोणती क्षेपणास्त्र अथवा रडार टेक्नोलॉजी घेतली हे शत्रू राष्ट्राला कळू नये म्हणून ही किंमत गुप्त राखण्यात येते.

राफेल करारावरून जो वाद सुरु आहे. खरं तर त्यात सामान्य माणसाने ही सगळी गणितं समजून न घेता बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. घोटाळा झाला की नाही हे ह्यातले तज्ञ योग्य रीतीने सांगू शकतात ज्यांना ह्या क्षेत्रातील माहिती आहे. नक्की खरं खोट करायला माननीय न्यायालय आणि इतर तज्ञ लोक विचारमंथन करतील. पण तूर्तास ह्या विमानांच्या खरेदीमुळे भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ झाली आहे हे निश्चित आहे. दाससौल्ट राफेल विमान तंत्रज्ञानाच्या बाबतीत परिपूर्ण असलेलं लढाऊ विमान आहे. त्यामुळे ह्याच्या क्षमतेवर कोणाचा आक्षेप नाही. आक्षेप असेल तर ह्यात केल्या जाणाऱ्या राजकारणावर आहे. पण भारताच्या संरक्षणाच्या दृष्ट्रीने पुढील काही वर्षात दखल होणारी दाससौल्ट राफेल लढाऊ विमाने महत्वाची असणार आहेत.

मनाचेTalks च्या लेखांबद्दल वाचकांच्या प्रतिक्रिया…

वाचण्यासारखे आणखी काही…

खगोल / अंतराळ
ललित
प्रेरणादायी/MOTIVATIONAL


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!